
कोसुंब येथे आयशर-रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू
संगमेश्वर : देवरूख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंब येथे आयशर-रिक्षाचा अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षामधील एक महिला ठार झाली, तर दोन चिमुकले बचावले. बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो हा देवरूखहून संगमेश्वरकडे चालला होता तर रिक्षा कसबा ते देवरूख असा प्रवास करीत होती. रिक्षा कोसुंब येथील वळणावर आली असता संगमेश्वरच्या दिशेने चाललेल्या आयशरची रिक्षाला जोरात धडक बसली. या अपघातात रिक्षामधील नाफिसा साजीद पठाण (29, रा. कसबा, संगमेश्वर) मयत झाली. तर अरहान मालदार (2 वर्षे) व हलीमा साजीद पठाण (8 महिने) ही दोन बालके या अपघातातून बचावली आहेत. अपघातबाबत अधिक तपास देवरूख पोलिस करीत आहेत.