बॅनर फाडण्याचा आरोप असणार्या आमदार राजन साळवींसह शिवसेना कार्यकर्ते निर्दोष
रत्नागिरी ः जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात लावण्यात आलेले बॅनर फाडून नुकसान केल्याप्रकरणातील संशियतांची न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली. अंदाजे दीड वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. कोरोना कालावधीत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत गैरकायदा जमाव करून बॅनर फाडल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
आमदार राजन साळवी (वय 54, रा. खालची आळी, रत्नागिरी), संजय साळवी (50,रा.तेली आळी, रत्नागिरी), परेश खातू (43, रा. संगमेश्वर), प्रसाद सावंत (40, रा.शिवाजी नगर, रत्नागिरी), प्रकाश रसाळ (66, रा. नाचणे, रत्नागिरी), प्रशांत साळुंखे (45,रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) आणि इतर 8 ते 10 जण अशी त्यांची नावे आहेत. संशयितांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.