
रामदास कदम यांची गुरुवारी नांदगाव येथे सभा
खेड : शिवसेना नेते रामदास कदम हे बाळासाहेबांची शिवसेना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यरत झालेले असून ते खाडी पट्टयाचा दौरा करणार आहेत. गुरूवार दि. 12 रोजी सायंकाळी 4 वाजता नांदगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला आमदार योगेश कदम देखील उपस्थित राहणार आहेत. खाडीपट्टा भागातील कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुका सचिव सचिन धाडवे यांनी केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असे धाडवे यांनी सांगितले.