रत्नागिरीतील श्रीया पवार बनली जिल्ह्यातील पहिली कमर्शियल पायलट
रत्नागिरी शहरातील श्रीया नटराज पवार यांनी जिल्ह्यातील पहिली कमर्शियल पायलट बनण्याचा मान मिळवला आहे. शहरातील डॉ. नटराज पवार, डॉ. उज्ज्वला पवार यांची सुकन्या असलेली श्रीया पवार ही बावीस वर्षीय तरूणी असून लवकरच एअर इंडियामध्ये पायलट म्हणून रूजू होणार आहे. फर्स्ट ऑफिसरचा मान तिला मिळाला आहे. इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीया पवार बारामती येथील कार्व्हर एव्हीगेशन्स संस्थेत प्रशिक्षणासाठी दाखल झाली. चार्टर्ड विमानासाठी आवश्यक असलेली कमर्शियल पायलट लायसन तिने मिळविले आहे.
कॅप्टन श्रीया पवार सध्या देशांतर्गत विमाने चालविणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाहतुकीसाठी एअर बस एई-३२० विमान उडवली जातात. त्याचे प्रशिक्षण श्रीया पवार हिने युरोप शहरात जावून घेतले आहे. एअर इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत श्रीया पवार हिने सुयश संपादन केले आहे. हैद्राबाद येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीया पवार हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. www.konkantoday.com