पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ईशा रहाटे सर्वसाधारण शहरी गुणवत्ता यादीत प्रथम

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८ वीचा) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ईशा रहाटे, रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी हिने सर्वसाधारण गटातून गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. रा. भा. शिर्के प्रशालेचे पाचवी ते दहावी व इ. आठवीचे १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस प्राप्त झाले आहेत. ईशा ही अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमातही अग्रेसर आहे. यावर्षी झालेल्या एनसीसीच्या एटीसी कॅम्पमध्ये बेस्ट कॅडेट प्रश्‍नमंजुषा व एकल गायन यातील स्पर्धांमध्ये रौप्यपदक प्राप्त केले आहे. तसेच एससीईआरटीमार्फत आयोजित कला उत्सव स्पर्धेमध्ये पारंपारिक गायन प्रकारात जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. ईशाला अभ्यासाबरोबरच शास्त्रीय गायन, भरत नाट्यम, हस्तकला, वाचन हे छंद आहेत. ईशाला या यशाबद्दल र. ए. सोसायटी नियामक मंडळ, मुख्याध्यापक शिक्षकांनी तिचे कौतूक केले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button