
पोलीस भरती प्रक्रिया रत्नागिरी जिल्ह्यात सुरू
गेले अनेक दिवस रेगाळलेली पोलीस भरती प्रक्रिया आज रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली आहे रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही पोलीस भरती अत्यंत कडे कोट पोलीस बंदोबस्तात सुरू आहे प्रक्रियेला सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे पोलीस भरतीसाठी एकूण 139 पदासाठी सव्वा आठ हजार अर्ज आले आहेत या पोलीस भरती प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार रत्नागिरीत दाखल झाले असून भरतीच्या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग केले जात आहे तसेच उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची बारकाईने छाननी केली जात आहे त्यामुळे ही सर्व चाचणी योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे
www.konkantoday.com