हर्णे येथे समुद्रात बुडून प्रौढाचा मृत्यू
दापोली : तालुक्यामधील हर्णे राणेवाडी येथील संदीप शिंदे या 52 वर्षीय प्रौढाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 25 डिसेंबर रोजी उघडकीस आली. या संदर्भात दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप शिंदे याला दारूचे व्यसन होते. रविवारी सकाळी दारूच्या नशेत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबर दापोली पोलिस ठाण्यात सतीश शिंदे यांनी दिली. या फिर्यादीनुसार दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गोरे करीत आहेत.