
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीतील अनधिकृत फलक हटवले
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौर्यात शहर विद्रुप दिसू नये म्हणून सोमवारी संपूर्ण शहरातील शेकडो अनधिकृत बॅनर, जाहिरात फलक काढून जप्त केले. सोमवारी सकाळपासून अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर, जाहिरात फलक हटवण्यास सुरुवात झाली. यामध्ये राजकीय बॅनरसह गृहकर्ज, पोट कमी करण्याबाबत, शिकवणी, हॉटेल, दिवाळी-दसरा शुभेच्छा फलकांचा समावेश आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या मालमत्ता विभागाकडून ही कारवाई केली जात आहे. शहरात रस्त्यांवर फिरणार्या मोकाट गुरांची समस्या कशी सोडवायची? हा नगर परिषदेसमोर मोठा पेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर साफसफाई, रंगरंगोटी यापूर्वीच सुरू झाली असली तरी शहरात फिरणार्या मोकाट गुरांचा प्रश्न अनुत्तरीच आहे.