महाराष्ट्रातील पहिले तर भारतातील पाचवे ऍक्टीव 3D थ्रीडी तारांगण रत्नागिरीत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोळा तारखेला शुभारंभ, पालकमंत्री उदय सामंत यांची भरीव कामगिरी
महाराष्ट्रातील पहिले तर भारतातील पाचवे ऍक्टीव 3D थ्रीडी तारांगण रत्नागिरीत उभारण्यात आले असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 16 डिसेंबर रोजी पार पडत आहे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे व पाठपुराव्यामुळे हे तारांगण उभे राहिले असून विद्यार्थी, अभ्यासक व पर्यटकांसाठी हे तारांगण आकर्षण ठरेल याबाबत कोणतीही शंका नाही
त्यामुळे
या डिसेंबरमध्ये रत्नागिरीकरांना चंद्राचा पृष्ठभाग कसा दिसतो याचे जवळून दर्शन घडेल आणि लघुग्रह कसे आदळतात याचाही अनुभव घेता येईल.
आंब्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या आपल्या रत्नागिरी शहरामध्ये नव्याने विकसित करण्यात आलेले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण जनतेसाठी खुले होत आहे. या नवीन स्टेट ऑफ द आर्ट ऍक्टिव्ह स्टिरिओ 3D थ्रीडी तारांगणामध्ये खगोलीय वस्तूचे प्रत्यक्ष अनुभव (रिअल टाइम) देणारे आणि तारांगणाचे गुंग करणारे थ्रीडी शो दाखवले जातील.
भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून रत्नागिरी नगर परिषदेने तारांगण (प्लॅनेटेरियम) आणि विज्ञान भवन (सायन्स पार्क) विकसित करण्यासाठी उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे.
या तारांगणातील आधुनिक उपकरणे मुंबईच्या इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पुरविली जात असून कार्यात्वितही केली जात आहेत.
विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या लोकप्रियतेसाठी अथकपणे करण्यासाठी स्थापन झालेली वचनबद्ध संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात अभिमान बाळगणार्या इन्फोव्हिजनने डिजिटल उत्पादनातील ऍक्टीव्ह 3D थ्रीडी तारांगण क्षेत्रामध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या इव्हान्स आणि सदरलँड कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या सहकार्याने भारतात ५० हून अधिक अत्याधुनिक तारांगणाची स्थापना केली आहे. यामध्ये आशियातील पहिले डिजिटल तारांगण मुंबई येथील नेहरू तारांगण (२००३) आणि पिलिकुला मंगलोर (२०१८) येथील भारतातील पहिले ऍक्टीव्ह 3D थ्रीडी डिजिटल तारांगण-स्वामी विवेकानंद तारांगण यांचा समावेश आहे.
रत्नागिरी येथील हे तारांगण महाराष्ट्राचे पहिले तर भारतातील पाचवे ऍक्टीव 3D थ्रीडी तारांगण असेल. रत्नागिरीचे हे ऍक्टीव्ह थ्रीडी तारांगण म्हणजे डिजिस्टर ७ ची 3D थ्रीडी आणि ऍक्टिव्ह 3D थ्रीडी प्लेबॅक सॉफ्टवेअरने सुसज्ज अशी खगोलशास्त्रीय प्रतिकृती (ऍस्ट्रोनॉमी सिम्युलेशन) आहे. डिजिस्टारचे डिअर-टाइम ग्राफिक इंजिन प्रगत भौतिकशास्त्रावर आधारित प्रस्तुतीकरण प्रणालीमुळे ग्रहांच्या पृष्ठभागावरील अत्यंत सूक्ष्म तपशील प्रस्तुत करण्यास सक्षम आहे. डिजिस्टारचे हे सॉफ्टवेअर अमेरिकेच्या नासाच्या डिजिटल युनिव्हर्समधील डेटा बेसच्या आधारे विकसित केलेले आहे.
डिजिस्टार रिअल टाइममध्ये आकारमानात्मक (व्हॉल्यूमेट्रिक) डेटा प्रस्तुत करण्यासाठी एक अत्यंत प्रगत अल्गोरिदम वापर असल्यामुळे अंतरिक्षातील ढग, नक्षत्रसमूह आणि आकाशगंगा हे सर्व प्रत्यक्ष आकारमानाच्या स्वरूपात प्रदर्शित केले जाऊ शकतात. आधुनिक आणि ऐतिहासिक अवकाशयान निरीक्षणे, धुमकेतू, लघुग्रह आणि अशी बीच माहिती देणारी डिजिस्टारची १०० हून अधिक प्रत्यक्षदर्शी (रिअल टाइम मॉडेल्स) उपलब्ध आहेत.
विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी कला आणि गणित म्हणजे STEAM- Science Technology, Engineering, Arts and Mathematics यापैकी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी कला आणि गणित अशा विविध वर्गीगणामध्ये डिजिस्टार उपलब्ध आहे.
या तारांगणात (खगोलशास्त्रीय) प्रत्यक्ष आकाशदर्शना व्यतिरिक्त खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान नैसर्गिक विज्ञान पृथ्वी विज्ञान आणि इतिहास इत्यादी विषयांवर टूडी आणि गुंग करणारे ऍक्टीव्ह थ्रीडी फुल डोम चित्रपट देखील दाखविले जातील. दररोज दाखवले जाणारे 2D टूडी आणि ऍक्टीव 3D थ्रीडी तारांगणाचे खेळ (शो) मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये असतील. तसेच प्रत्येक खेळ (शो) ३०-३५ मिनिटांचा असेल. या तारांगणाची आसन क्षमता (प्रत्येक खेळासाठी) ६५ आसनांची आहे.
या तारांगणाच्या उभारणीचा आराखडा आणि तांत्रिक बाबींसाठी सल्लागार म्हणून श्री. केतन करडीले, सार्थ एंटरप्रायजेस पुणे यांचे सहकार्य लाभले आहे.
पुढील काही महिन्यात या ऍक्टीव 3D थ्रीडी तारांगणाचा भाग असणारे कला आणि विज्ञान भवन देखील जनतेसाठी खुले केले जाईल आणि हा परिसर म्हणजे मनोरंजनासह आधुनिक शिक्षणाचा प्रसार करणारे केंद्र असेल.
सुंदर सागरी किनारा लाभलेले रत्नागिरी आकाशदर्शनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. रात्रीच्या आकाशातल्या ग्रह तार्यांचे निरिक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे हे तारांगण आणि विज्ञान भवन रत्नागिरीमधील जिज्ञासू मुलांसाठी प्रमुख रंजक आणि उदबोधक केंद्र बनेल. इथे येवून आकाशाच्या निरीक्षणाची गोडी लागलेल्या मुलांमध्ये माननीय ए. पी. जे. कलाम यांच्यासारखा शास्त्रज्ञ किंवा एखादी कल्पना चावला सारखी अंतराळवीर दडलेली असल जे रत्नागिरीची कीर्ती सर्वदूर नेतील.
www.konkantoday.com