ते आले त्यांनी नमस्कार केला व पुढे गेले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे दापोली दौऱ्यावर येणार म्हणून त्यांच्या मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती. सोमवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे दापोली शहरात येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी,कार्यकर्ते,असंख्य नागरिक राज ठाकरेंना पाहण्यासाठी भेटण्यासाठी ते बोलतात ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण राज ठाकरेंनी अशी कोणतीही भेट व वेळ न देता केवळ गाडीबाहेर येऊन पुढीलसीटच्या डोअर मधुन बाहेर आले नमस्कार केला आणि पुन्हा कारमध्ये बसले व पुढे निघून गेले पण राज ठाकरेंची भेट न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. येथे असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते थांबतील असा अंदाज होता पण तोही अनेकांचा अंदाज राज ठाकरे यांनी चुकवला आहे                                                                                                जवळपास एक ते दोन तास दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या केळस्कर नाका परिसरात संध्याकाळी पाच वाजल्यापासून असंख्य पदाधिकारी व नागरीक थांबुन होते. त्यांचे स्वागत करून फटाकांच्या आतषबाजी करत फटक्यां माळ लावण्याची तयारी ठेवली होती. पण राज ठाकरे यांनी गाडीतुन खाली न  उतरताच गाडीतूनच हात जोडुन नमस्कार करत ते पुढे निघून गेले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी अनेक पदाधिकारी, नागरिक सज्ज होते असंख्य कार्यकर्ते व असंख्य नागरिक राज ठाकरे भेटतील राज ठाकरेंना पाहता येईल ते काय बोलतात ते ऐकता येईल यासाठी सायंकाळी पासून त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसले होते, राज ठाकरेंचा ताफा संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या राज यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झाला. सायंकाळी  काळोखातही उभे होते. दापोलीकरांनी मोठी गर्दी केली होती मनसे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सगळ्यांना पाहून राज ठाकरेंचा ताफा थांबेल बोलतील या आशेवर अनेकजण होते. राज यांचा ताफा स्लो झाला राज ठाकरेंनी गाडीतुनच नमस्कार केला व काही क्षण ते थांबले गाडीच दार उघडलं त्यांनी उतरून फुटपॅड उभे उभे राहिले हात जोडुन मोठा नमस्कार केला अभिवादन केल व ते पुन्हा गाडीत बसले आणि पुढे मार्गस्थ झाले.     त कार्यकर्ते व नागरिक व राज ठाकरेंना पाहण्यासाठी त्याला बघण्यासाठी आले होते
आता मंगळवारी सकाळी ११ वा दरम्यान राज ठाकरेंचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.आता ते यावेळी कोणती भूमिका मांडतात?याकडे अनेकांच लक्ष आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button