वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वेमार्गावर एलटीटी ते मंगलुरू आणि मडगावसाठी दोन विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार
वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वेमार्गावर एलटीटी ते मंगलुरू आणि मडगावसाठी दोन विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.एलटीटी ते मंगलुरू ही गाडी क्र.01453 येत्या ९ डिसेंबरपासून ६ जानेवारीपर्यंत दर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मंगलुरू ते एलटीटी ही गाडी क्र. 01454 मंगलुरू येथून येत्या १० डिसेंबरपासून ७ जानेवारीपर्यंत दर शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना जाताना आणि येताना कोकणात ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी येथे थांबे असतील. गाडीला १७ डबे असतील. त्यातील ४ वातानुकूलित, तर ८ द्वितीय श्रेणी शयनयान असतील.
दुसऱ्या एलटीटी ते मडगाव आणि परत या गाडीची एकच फेरी होणार आहे. गाडी क्र. 01455 एलटीटी ते मडगाव या मार्गावर १ जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01456 मडगावहून २ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुटेल आणि रात्री पावणेबारा वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी जाताना आणि येताना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी येथे थांबेल. या गाडीलाही १७ डबे असतील. त्यातील ४ वातानुकूलित, तर ८ द्वितीय श्रेणी शयनयान असतील.
www.konkantoday.com