रत्नागिरीजिल्ह्यात ७७ कुपोषित बालके
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात ७७ कुपोषित बालके आढळून आली आहेत. त्यांना पोषण आहार आणि औषधं देण्यासाठी ४२ ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू केली आहेत. ९० दिवसांसाठी पोषण आहार आणि औषदांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक सहा महिन्यांनी सर्व्हेक्षण मोहीम हाती घेतली जाते. जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी कर्मचार्यांमार्फत कुपोषित बालकांची माहिती संकलित केली जाते. मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील ७० हजार ४४८ बालकांची तपासणी करण्यात आली. ६७० बालके मध्यम कुपोषित (मॅम) असून ७७ अति कुपोषित (सॅम) बालकं आहेत. कमी वजनाची ६९६ बालके आढळून आलेली आहे. अति कुपोषित बालकांची काळजी घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्र सुरू केली आहेत.
www.konkantoday.com