लोटेतील स्फोटात भाजलेल्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, एकूण संख्या तीनवर

0
19

खेड : लोटे येथील डिव्हाईन केमिकल्स कंपनीमधील स्फोटामध्ये भाजलेल्या आठ कामगारांपैकी दोन कामगारांपाठोपाठ दिलीप शिंदे या गंभीर भाजलेल्या कामगाराचा नवी मुंबईतील ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये रविवारी दि.20 रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या दुर्घटने प्रकरणी प्रकरणी अन्य पाच जणांवर उपचार सुरू असून त्यातील काही कामगार 70 ते 80 टक्के पेक्षा जास्त होरपळले असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.
डिवाईन केमिकलमध्ये रविवारी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या स्फोटानंतर आठ कामगार होरपळले होते. त्यापैकी संदीप गुप्ता याचा 14 नोव्हेंबर रोजी त्या नंतर शुक्रवारी विपल्य मंडल या कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता तर त्या पाठोपाठ त्याच रुग्णालयात उपचार घेणार्‍या दिलीप शिंदे या आणखी एका कामगाराचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here