हवामानातील सततच्या चढउतारामुळे हापूस हंगाम महिनाभर लांबणार?

0
21

गेल्या आठवड्यात तापमानात चढ-उतार होता. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या दोन दिवसात मतलई वारे वाहू लागल्यावर पारा घसरला असून, दापोलीत १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सध्याचे वातावरण हापूसला पोषक असले तरीही ऑक्टोबर हिट म्हणावी तशी जाणवलेली नसल्यामुळे आंबा हंगाम एक महिना पुढे जाण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.
उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांचा प्रवास थांबून थांबून सुरू होता. परिणामी कोकणात मागील आठ दिवसांमध्ये थंडीची तीव्रता कमी अधिक होती. पहाटेला थंडी जाणवत असली तरीही त्यात तेवढा जोर नव्हता. मागील आठवड्यात दापोली तालुक्यात सर्वात कमी १३.२ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. त्यानंतर पुन्हा पारा वर चढू लागला. कालपासून वातावरणात बदल होवू लागले असून, सलग दोन दिवस वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा जोर वाढला असून, हापूसला पोषक वातावरण आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here