वनविभागाच्या पथकाने पाच सापांना दिले जीवदान
मानवी वस्तीत आलेले किंवा संकटात सापडलेल्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून सुरू केलेल्या सेवेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे रत्नागिरीमध्ये पाच सापांना (दोन नाग, तीन धामण) वनविभागाच्या पथकाने पकडून जीवदान दिले.
तालुक्यात विविध ठिकाणी मानवी वस्तीमध्ये साप येत असल्याचे प्रकार वारंवार घडतात. नागरिकांकडून वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला जातो. रेल्वे स्टेशनजवळील प्रमिला कॉम्प्लेक्स येथे मोटार सायकलमध्ये नाग अडकल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचार्यांमार्फत बचावकार्य सुरू करण्यात आले. तसेच मिर्याबंदर येथे मासे पकडण्याच्या जाळ्यात साप अडकल्याची माहिती दूरध्वनीवरून सांगण्यात आली होती. तर मिरकरवाडा येथील एका घरात धामण प्रजातीचा साप असल्याचे कळवण्यात आले. तिन्ही ठिकाणी वनविभागामार्फत सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
www.konkantoday.com