राज्य पतसंस्था फेडरेशन निवडणूक ॲड.दीपक पटवर्धन यांना सहकार समृद्धी पॅनेल मधून उमेदवारी
राज्यस्तरावर पतसंस्थांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनची निवडणूक जाहीर झाली असून सध्या फेडरेशनचे अध्यक्ष असलेले काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे डॉ.उदयजी जोशी यांचे नेतृत्वाखालील सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढवत आहे. राज्यातील पतसंस्थांसाठी सध्या कार्यरत असलेल्या काकासाहेब कोयटे यांचे नेतृत्वाखालील संचालक मंडळाने भरीव काम केले असून पतसंस्थांचे अनेक प्रश्न तडीस नेण्याचे काम केले आहे. अंशदानामुळे पतसंस्थांवर पडणाऱ्या मोठ्या आर्थिक बोजाला स्थगिती देण्यासाठीचे मोठे योगदान काकासाहेब कोयटे यांचे आहे. सदर संचालक मंडळामध्ये ॲड. दीपक पटवर्धन हे तज्ञ संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांना काकासाहेब कोयटे यांचे पॅनल मध्येच उमेदवारी मिळाली असून मतदार संघातील बदलानंतर आता राज्यस्तरावरून संचालक प्रतिनिधींची निवड होणार आहे. यासाठी राज्यातील १३०० पेक्षा जास्त संस्थांचे प्रतिनिधी मतदान करणार असून काकासाहेबांचे नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनलचा मोठा विजय अपेक्षित आहे असे ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पतसंस्था प्रतिनिधींशी संपर्क झाला असून त्यांनी सहकार समृद्धी पॅनलला आपला पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे या निवडणुकीत १००% यश मिळेल असे ॲड.पटवर्धन यांनी प्रतिपादन केले. सदर निवडणूक ही १४ डिसेंबर २०२२ रोजी होणार असून प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी मतदान केंद्र असणार आहे . २१ उमेदवार निवडून यायचे असून सहकार समृद्धी पॅनलमध्ये श्री.काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे महासचिव डॉ.उदयजी जोशी यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात खालील उमेदवार समाविष्ट करण्यात आले आहेत.
सहकार समृद्धी पॅनल
श्री.ओमप्रकाश दादाप्पा कोयटे, श्री.वसंत नाथा शिंदे, श्री.राधेश्यामजी देवकिसनजी चांडक, श्री.दादाराव भाऊराव तुपकर, श्री.डॉ.शांतीलाल तेजमल सिंगी, श्री.शशिकांत बापूसाहेब राजोबा,श्री.चंद्रकांत श्रीरंग वंजारी, श्री.ॲड.दीपक मनोहर पटवर्धन,श्री.सुभाष गोविंदराव आकरे,श्री.धनंजय गजानन तांबेकर, श्री.रवींद्र नामदेव भोसले,श्री.जवाहर दौलतराम छाबडा, श्री.भास्कर मारुती बांगर, श्री.वासुदेव दिगंबर काळे,श्री. नीलिमा किशोर बावणे ,श्री. नारायण केरुजी वाजे, श्री.राजुदास लक्ष्मणराव जाधव,श्री.सुरेश गणपत पाटील,सौ.ॲड.अंजली गोपाळ पाटील, सौ.भारती राजेंद्र मुथा,श्री.शरद रामचंद्र जाधव