मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर तक्रार दाखल
दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी या रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांच्या विरोधात बुरोंडीचे मंडल निरीक्षक शरदचंद्र सानप यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उपविभागीय अधिकारी दापोली यांनी या रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याच्या दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने ही तक्रार देण्यात आली. मौजे मुरुड येथील गट नंबर 446 एकूण क्षेत्र 1-26-40 या क्षेत्रापैकी एक तृतीयांश क्षेत्र 0-42-14 हे सदानंद गंगाराम कदम यांच्या मालकीचे असून या क्षेत्रामध्ये रिसॉर्ट साई एन एक्स हे 2021 मध्ये वाणिज्य कारणासाठी इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी दापोली यांनी मंडल निरीक्षक यांना सदानंद कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते.