लांजाचे फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी फणसाच्या रोपांपाठोपाठ आता सीताफळांची रोपेही परदेशात पाठवली
लांजाचे फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी फणसाच्या रोपांपाठोपाठ आता सीताफळांची रोपेही परदेशात पाठवली आहेत.
या माध्यमातून व्यवसायाचे एक मोठे दालन देसाई यांनी खुले केले आहे.
फणसाच्या विविध जाती लावून नवी कृषिक्रांती करणारे फणसकिंग मिथिलेश देसाई यांनी २० दिवसांपूर्वीच फणसाची रोपे परदेशात पाठवली. प्रथमच असा प्रयोग झाला. आता त्यापाठोपाठ त्यांनी सीताफळाची रोपेही मॉरिशसला पाठवली आहेत. सीताफळे खूपदा देशातून परदेशात गेली आहेत; पण यावेळी चक्क त्याची रोपे परदेशात गेली आहेत. ज्यांनी फणसाची रोपे नेली होती, ते मॉरिशसमधील शेतकरी उदेश यांनीच ही रोपे नेली आहेत.
फणसाप्रमाणेच सीताफळाची ३०० रोपे माती व पाण्याविना पाठवण्यात आली आहेत. सात दिवस पाणी आणि मातीशिवाय राहू शकतील, अशी प्रक्रिया करून ही ३०० रोपे केवळ २ खोक्यांमधून पाठवण्यात आली आहेत. त्यांचं वजन फक्त ७ किलो इतकंच झालं आहे.
www.konkantoday.com