अण्णा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लेखन, फोटोग्राफी आणि व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि कोमसाप यांनी दापोली तालुक्यात अण्णा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लेखन, फोटोग्राफी आणि व्हिडिओ स्पर्धा आयोजित केली आहे. तीन विषयात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
निबंध स्पर्धेसाठी विषय माझे गाव (गावगाथा) असणार आहे. यात दापोली तालुक्यातील कोणतेही गाव, गावातील वैशिष्ट्यपूर्ण असे देवस्थान – उत्सव – प्रथा-परंपरा – यात्रा-जत्रा – गावातील कर्तबगार व्यक्ती – घराणी वा उपक्रमशील संस्था अशा कोणत्याही विषयावर बाराशे-पंधराशे शब्दांत लेख लिहून पाठवणे अपेक्षित आहे.
लेखस्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या लेखास 2000 रुपये दुसऱ्या क्रमांकाच्या लेखास 1500 रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या लेखास 1000 रुपये बक्षीस असणार आहे. उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्येकी पाचशे रुपये.
दुसरी स्पर्धा व्हिडिओ स्वरूपात घेण्यात येईल. यासाठी दापोलीतील गावांची माहिती, कर्तबगार व्यक्ती वा उपक्रमशील संस्था, ऐतिहासिक ठिकाणे, देवस्थान, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक जीवन, निसर्गवैभव अशा कोणत्याही विषयावर तीन ते चार मिनिटे कालावधीचा व्हिडिओ तयार करणे. व्हिडिओ स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या व्हिडिओस 3000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओस 2000 रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओस 1000 रुपये बक्षीस असणार आहे.
याशिवाय, स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकास विशेष पारितोषिक मिळू शकणार आहे. आयोजकांनी सुचवलेल्या सुधारणा व वाढीव तपशील यांसह लेख वा व्हिडिओ पाठवल्यास संपादकांच्या सुचनेनुसार तो ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवर स्पर्धकाच्या छायाचित्र-अल्पपरिचयासह प्रसिद्ध करण्यात येईल व त्यासाठी मानधन मिळेल.
तिसरी स्पर्धा फोटोग्राफी असणार आहे. यासाठी दापोलीतील ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिपणारे फोटो आणि त्याबाबतची थोडक्यात माहिती हा विषय देण्यात आला आहे. फोटोग्राफी स्पर्धेत अनुक्रमे 2000, 1500 व 1000 रुपये बक्षीस असणार आहे.
या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. स्पर्धकांनी त्यांचे साहित्य 10 डिसेंबरपर्यंत पाठवावे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या तालुकावार माहिती संकलन मोहिमेस ‘परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन’चे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क – अश्विनी भोईर 8830864547, नितेश शिंदे 9892611767 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इमेल – info@thinkmaharashtra.com
वेबसाईट – www.thinkmaharashtra.com
www.konkantoday.com