रत्नागिरी जिल्ह्यात ३०२ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे
पावसाची अचूक नोंद घेण्यासाठी स्कायमेटच्या महावेध प्रकल्पांतर्गत राज्यात अतिरिक्त हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ३०२ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी जाणार आहेत.
स्कायमेटच्या महावेध प्रकल्पांतर्गत शासन हवामानाची माहिती घेते. राज्यात २११७ हवामान केंद्रेे उभारली आहेत. ही संख्या मर्यादित असल्याने हवामान केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार राज्यांमध्ये १० हजार स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. www.konkantoday.com