गणपतीपुळे येथे संकष्टीनिमित्त भाविकांची मांदियाळी
गणपतीपुळे : संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळे येथे भाविकांची मांदियाळी दिसून आली. मंदिरामध्ये सायंकाळपर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस जोडून शासकीय सुट्ट्या आल्यामुळे गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पहाटे 5 वाजता पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता गणरायाची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. चंद्रोदयानंतर आरती होईपर्यंत रात्री 9.15 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.