ऊत्तराखंडच्या आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या 5 औषधांची निर्मिती थांबवण्याचे दिले आदेश
ऊत्तराखंडच्या आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या 5 औषधांची निर्मिती थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या औषधांमध्ये कोणते घटक आहेत हे जाणून घेण्यासाठी प्राधिकरणाने फॉर्म्युलेशन शीट सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.दिव्य फार्मसी ही योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली प्रॉडक्टसाठी औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. ही कंपनी रक्तदाब, मधुमेहासह अन्य गंभीर आजारांवर औषधे तयार करते.
दिव्य फार्मसी तयार करत असलेल्या बीपीग्रिट, मधुग्रित, थायरोग्रिट, लिपिडोम टॅबलेट, आईग्रिट गोल्ड टॅबलेट या औषधांची निर्मिती थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही औषधे अनुक्रमे रक्तदाब, मधुमेह, गॉइटर, ग्लोकोमा आणि उच्च कोलेस्ट्रॉलवर इलाज म्हणून बनवण्यात येतात. उत्तराखंडच्या आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने या औषधांची निर्मिती थांबवण्याचे आदेश दिल आहेत. प्राधिकरणाने या औषधांच्या फॉर्म्युलेशनचा अहवालही सादर करण्यास सांगितले आहे. या फॉर्म्युलेशनला जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत या औषधांची निर्मिती करता येणार नाही असे सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com