झोपडपट्टीमुक्त रत्नागिरीसाठी ८५० झोपडीधारकांना लवकरच मिळणार पक्की घरे
रत्नागिरी शहरातील सुमारे ८५० झोपडपट्टीधारक आणि हमाल पंचायतीच्या काही जणांना लवकरच पक्की घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक झाली. शहरातील साळवी स्टॉप येथे त्यांच्यासाठीची जागा आरक्षित आहे जागा देण्यापेक्षा या सर्वांसाठी इमारत बांधून प्रत्येकाला वन आरके ब्लॉक म्हणजे हक्काचे घर देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करू, असा निर्णय बैठकीत झाला. रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com