
किरीट सोमय्या शुक्रवारी रत्नागिरीत; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची घेणार भेट
रत्नागिरी : जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या शुक्रवारी रत्नागिरीत येणार आहेत. साई रिसॉर्ट कारवाई प्रकरणातील सद्यस्थिती ते जाणून घेणार आहेत. रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेश केंद्रीय पर्यावरण विभागाने दिला आहे. माजी खा. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले होते. माजी खा. किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांसह अन्य अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या बदल्या होऊन नवे अधिकारी दाखल झाले आहेत. या अधिकार्यांची भेट घेऊन साई रिसॉर्ट प्रकरणात कारवाईच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेऊन चर्चा करणार आहेत.