छत्रपती नगर नाचणे रोड साळवी स्टॉप येथे “श्री पद्मदुर्ग (कासा) किल्याची” भव्यदिव्य प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी ,आजचा शेवटचा दिवस
श्री शिवशंभू मित्रमंडळ आणि मित्र परिवार
गौरव सावंत बंधू आणि मित्रपरिवाराने दिपावलीनिमित्त छत्रपती नगर नाचणे रोड साळवी स्टॉप येथे “श्री पद्मदुर्ग (कासा) किल्याची” भव्यदिव्य प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्यावर कोठेश्वरी मंदिर, हौद, तुटलेली तटबंदी, सौचकूप, सौरक्षक भिंत, खोल्या, महादरवाजा, ताटातील खोल्या, कामळातील आकाराचे बुरुज, टाके, तटामधील खोल्या, प्रवेशद्वार, तोफा, शिवरायांची मूर्ती , हौद, तुळशीवृंदावन अशी सजावट केलेली आहे. हा किल्ला साकारण्यासाठी शौर्य मांजरेकर, अखिलेश बांबाडे, श्रीयोग चव्हाण, सुधीर मावडी, आदेश शेलार, अथर्व शिंदे, तनिष रेडीज, कुणाल धूंदूर, अभिजित गिरकर, अजय रेडीज, वेदांत सावंत, वैभव पांचाळ, अथर्व खेडेकर, रुद्र चव्हाण’ रवी शाह, विनय कदम, ओंकार ठाकूर , आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, शिवांगी चव्हाण , नेहा सावंत, ऋषी दुधाणे, सिद्धू पुजारी, मनीषा मावडी, अंशिका शिंदे, चिन्मय खटकुळ, प्रसाद सावंत,ईशान कदम’वेदिका चव्हाण, निखिल सावंत, गौरव सावंत यानी हा पद्मदुर्ग (कासा) किल्ला साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
हा किल्ला चारही बाजूने समुद्रा मध्ये असून या किल्ल्याची लांबी ३० फूट, रुंदि १५ फूट आणि उंची ४ फूट आहे. हा किल्ला पाहण्याची वेळ सायं ६ ते रात्रौ ११ वाजे पर्यंत आहे . हा किल्ला आज त्रिपुरा पोर्णिमे पर्यंत पाहण्यासाठी खुला ठेवण्यात येणार आहे . किल्ला पाहण्यासाठी इतिहास प्रेमी व किल्ला प्रेमींची गर्दी होत आहे. हा किल्ला आजचा दिवस पाहता येणार आहे
www.konkantoday.com