निवळी घाटात बावनदी नजीक अपघात
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निवळी घाट येथील बावनदी नजीक एका वळणावर एसटी बस आणि खासगी आरामबस यांच्यात समोरा – समोर धडक झाली. यात एसटी चालक , वाहक आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , याप्रकरणी खासगी बस चालक कालीदास हरिश्चंद्र कवठणकर ( ६३ , मुळ . रा . उत्तर गोवा ) विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे . त्याच्याविरोधात एसटी बस चालक साठवाराव गणेशराव येळणे ( ४० , मुळ रा . हिंगोली सध्या रा . कारवांचीवाडी , रत्नागिरी ) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . त्यानुसार , बुधवारी पहाटे ते त्यांच्या ताब्यातील एसटी बस ( एमएच – २० – बीएल – ४०२८ ) मधून वाहक भूषण खांडेकर ( ३७ , मुळ रा . बत्तीस शिराळा सांगली ) यांना घेऊन प्रवाशांसह चिपळूण – रत्नागिरी असे येत होते . सकाळी ६ वाजता सुमारास ते बावनदी येथील वळणावर आले असता गोवा ते मुंबई जाणाऱ्या खासगी बस टेंम्पररी नंबर ( जीए- ०२ एमआर- ३१८ ) वरील चालकाने पुढील ट्रकला ओव्हरटेक करताना रस्त्याच्या विरुध्द दिशेला येत एसटी बसला समोरुन धडक देत अपघात केला.