तिसे येथे मोटारीला एसटी बसची पाठीमागून धडक

खेड : तिसे मोहल्ल्यात घरासमोर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला एसटी बस चालकाने पाठीमागून धडक दिली. हा अपघात दि.17 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडला.महमद सईद तिसेकर (वय 72, रा. तिसे, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शहजाद तिसेकर याच्या नावे असलेली कार (एमएच 08, एएन2398) तिसे मोहल्ल्यात घरासमोर रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवण्यात आली होती. त्यावेळी खेड येथून तिसे गावात जाणारी एसटी बस ( एमएच 20 बीओ 0880) वरील चालक शंकर एकनाथ कांगणे (वय 32, रा. नाडकर बिल्डिंग खेड, मूळ रा. गंगाखेड-परभणी) याचा बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बसची धडक कारला बसली. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button