मुलीला वडील ओरडले म्हणून आईने केले फिनेल प्राशन
रत्नागिरी : काजल कृष्णा बेगडा (वय 26, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) या महिलेने फिनेल प्राशन केले. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सोमवारी दि.17 ऑक्टोबर दुपारी अडीचच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल हिचा पती तिच्या लहान मुलीला रागाने ओरडला. त्याचा राग मनात धरून काजलने फिनेल प्राशन केले. पती कृष्णा बेगडा यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.