भालावली ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेची तर सरपंच भाजपचा!
राजापूर : तालुक्यातील भालावली ग्रामपंचायतीच्या निकालात चुरस दिसून आली. एकूण नऊ जागांपैकी सहा जागा शिवसेनेने जिंकून भालावलीवर भगवा फडकवला. मात्र थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार अमोल नार्वेकर हे भाजपाचे उमेदवार प्रकाश घवाळी यांच्याकडून 24 मतांनी पराभूत झाले. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. भाजपचे सरपंच पदासह तीन उमेदवार जिंकून आले. भालावली ग्रामपंचायतीमधून रामचंद्र झोरे, प्रणाली केळवाडकर, अनघा सिनकर, प्रवीण जाधव, अश्विनी हळदणकर, उषा मराठे, सूर्यकांत साळवी, विलास गुरव, सुवर्णा गुरव हे उमेदवार विजयी झाले.