शिक्षक बदल्यांचा निर्णय ग्रामविकास विभागावर अवलंबून
रत्नागिरी : राज्यातील आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करत रिक्त जागांवर संबंधित शिक्षकांना समुपदेशनाने नेमणुका दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद पातळीवर जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळताच गुरूजींच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. यामुळे यंदाच्या बदल्यांकडे शिक्षक नजरा लावून आहेत. मात्र, दरवर्षी होणार्या मे अथवा जून महिन्यांत होणार्या शिक्षकांच्या बदल्यांना ऑक्टोबर महिना उजाडला तरी अद्याप मुहूर्त लागलेला नाही. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शिक्षकांच्या बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत केली असून या प्रणालीची चाचणीत मोठा कालावधी गेला. त्यानंतर रखडत आंतरजिल्हा बदली शिक्षकांची प्रक्रिया पार पडली. ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन बदल्याची प्रक्रिया घेणार्या संबंधीत एजन्सीने नव्याने जिल्हांतर्गत बदल्यासाठी शिक्षकांकडून माहिती घेतली आहे. आता शिक्षकांच्या बदल्याची फाईल अंतिम मान्यतेसाठी ग्रामविकास विभागार असून ग्रामविकास मंत्र्यांन हिरवा कंदील दाखवताच जिल्ह्यातंर्गत बदल्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.