ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मद्य विक्री मनाई आदेश जारी

रत्नागिरी :- राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या तालुक्यातील माहे जानेवारी 2021 ते मे. 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व माहे जून 2022 ते सप्टेंबर, 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान व 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे.
सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधीत ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3. एफएल-2. सीएल/एफएल/टिओडी-3. एफएल-3. एफएल/बीआर-2. टिडी-1 इत्यादी) 15.10.2022 ( मतदानाच्या आदला दिवस), 16.10.2022 ( मतदानाचा दिवस), 17.10.2022 (मतमोजणीचा दिवस) या कालावधीत संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तेथे सदर आदेश लागू होणार नाहीत. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधीत अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button