गौरी गणपती आरास स्पर्धेला भरघोस प्रतिसाद निकाल जाहीर. विजेत्यांचे अभिनंदन…
व्यास क्रिएशन्स ही केवळ एक प्रकाशन संस्था नसून हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात नव-नवीन सदस्य सामील होत आहेत. व्यास क्रिएशन्सतर्फे सध्या निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. ७ ऑक्टोबर हा शेवटचा दिनांक असून अधिक माहितीसाठी ९९६७६३७२५५/८७७९४१४३३८ या क्रमांकावर संपर्क करता येईल.
तसेच संस्थेतर्फे खास गणेशोत्सवानिमित्त कोकण विभागासाठी गौरी गणपती आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये उत्साही गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. त्यामुळे विविध स्पर्धा व उपक्रमांच्या माध्यमातून व्यास क्रिएशन्सच्या कुटुंबामध्ये अनेक सदस्य सामील होत आहेत.
या साऱ्यांचे कौतुक करणे स्वाभाविक आहे. आपणा साऱ्यांना या स्पर्धेचा निकाल काय असेल याची उत्सुकता असेलच! तर नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आम्ही या स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. पारितोषिक वितरण समारंभ २१ ऑक्टोबर रोजी ठाण्यात सहयोग मंदिराच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता व्यास क्रिएशन आयोजित भव्य दीपोत्सवात होणार आहे! सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
व्यास क्रिएशन्सच्या कुटुंबात तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. जर अजूनही कुटुंबात प्रवेश केला नसेल तर व्यास क्रिएशन्सच्या आगामी स्पर्धा व उपक्रमांमध्ये जरुर सहभागी व्हा.
गौरी गणपती आरास स्पर्धेच्या विजेत्यांनी ८६५२२३३६७६ / ९९६७६३७२५५