श्री सौरभ सुरेश मलूष्टे आपणाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अत्यंत खडतर परिस्थितून उभे राहिलेले एक सुंदर व तडफदार युवा नेतृत्व म्हणजे सौरभ मलूष्टे, कै सुरेश उर्फ बाळ्या मलूष्टे यांच्या अपघाती निधनाने अचानक झालेला मनावरचा आघात झेलून, अत्यंत शांत पणे आपल्या व्यवसायाकडे आपण लक्ष दिलेत. पैसे सगळेच कमवतात पण ते कमविताना आपण गावागावातील,समाजातील माणसे व मित्र कमविलेत व आज आपणाकडे माणसाची खूप संपत्ती आहे.
कोणालाही मदत करताना आपण पुढे असता, कोणतीही अडचण माणसाला आली की लगेच एक नाव लक्षात येते ते सौरभ मलूष्टे. मदतीला धावून जाणे हा आपला एक स्वभाव बनला आहे, मेहनत व जिद्द याच्या जोरावर आपण आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
सौरभ तुझी उत्तरोत्तर खूप प्रगती होऊन तुला उज्वल यश मिळो हीच श्री राधाकृष्ण चरणी प्रार्थना
वैश्य युवा संघटना