वाहनांना व्हीआयपी नंबर घेताना वाहनधारकांच्या खिशाला चाट बसणार

0
103

आपल्या नव्या वाहनाचा नंबरही लय भारी असावा यासाठी कितीही रक्कम मोजायला अनेक वाहनधारक तयार असतात. त्यामुळे मग ”व्हीआयपी” नंबरला प्राधान्य दिले जाते. मात्र आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांना व्हीआयपी नंबर घेताना वाहनधारकांच्या खिशाला चाट बसणार आहे. याचा अध्यादेश शासनाने काढला असून पुढील महिन्यापासून चॉईस नंबरसाठी सध्या असलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नवीन सीरियल सुरू झाल्यानंतर ”व्हीआयपी” क्रमांकासाठी अर्ज घेतले जातात. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने हे क्रमांक दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने सर्व प्रकारच्या वाहनांची व्हीआयपी अथवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. या अधिसूचनेमध्ये निश्चित केलेल्या दरासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here