…म्हणून घोड्याचे डोळे बाजूने झाकतात!

0
400

रत्नागिरी : इतर प्राण्यांपेक्षा घोड्याचे डोळे वेगळे असतात. सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की त्याच्या डोळ्यांची जागा. त्याचे डोळे डोक्याच्या पुढे नसून डाव्या आणि उजव्या बाजूला असतात. यामुळे घोड्याची नजर ही एकदृष्टी असते. बाकीचे प्राणी आणि माणसाची नजर ही उभयनेत्री असते. कारण त्यांचे डोळे हे तोंडावर समोरच्या बाजूला असतात. त्यामुळे आपल्याला वस्तू समोर दिसतात.
आपल्या दोन डोळ्यांचे कार्य मेंदुमार्फत चालते. मेंदू दोन डोळ्यांच्या प्रतिमा एक करून आपल्याला तीन मितीत चित्र दाखवतो. यामुळे आपल्याला थ्री डायमेन्शन मध्ये प्रतिमा दिसते आणि मेंदूमुुळे आपल्याला दोन वस्तूतील अंतर व आपल्यापासूनच्या अंतराची कल्पना येते. घोड्याच्या डोळ्यांच्या रचनेमुळे त्याला थ्री डायमेंशनमध्ये वस्तू दिसायला अवघड जाते. त्याला त्या वस्तूच्या डाव्या आणि उजव्या डोळ्यांमुळे दोन प्रतिमा दिसतात. त्यामुळे गाडी ओढताना समोरच्या रस्त्याचा अंदाज आणि रस्ता समोर दिसण्यासाठी त्याला डोळ्यांवर खूप ताण द्यावा लागतो.
या दोन डोळ्यांच्यामधील जास्त अंतरामुळे रस्ता समोर बघणे त्याला अवघड जाते यामुळे पुढ्यातील वस्तू बघण्यासाठी तो त्याचे डोके एकदा डाव्या आणि एकदा उजव्या बाजूला वळवतो. त्यामुळे जॉकी अडथळ्यांवरून उडी मारताना घोड्याचा लगाम ओढत नाही. घोड्याला तसा अडथळ्यांचा अंदाज येत नाही पण उडी मारायच्या आधी तो काही सेकंद विचार करून त्या अंदाजाने उडी मारतो. उडी मारताना त्याला अडथळा दिसत नाही. कारण 4 फुटांवरील वस्तुचे फोकसिंग करायला त्याला येत नाही.
थोडक्यात समोर बघण्यासाठी तो बळजबरीने आपले डोळे पुढील बूजकडे वळवतो. कारण त्याच्या डोळ्यांची समोर बघण्यासाठी रचना केलेली नसते. त्यामुळे असे चित्र फार प्रयासाने त्याला दिसू शकते आणि डाव्या उजव्या बाजूकडे काही जरी दिसले तरी त्याचे लक्ष विचलित होते. घोडा गाडी ओढताना त्याला समोरचे दिसणे महत्त्वाचे आहे. जर त्याचे लक्ष डाव्या किवा उजव्या बाजूकडे गेले तर तो समारेचा रस्ता नीट बघू शकणार नाही. यासाठी त्याच्या डोळ्यांच्या बाजूने काळ्या रंगाचे कापड लावून डोळ्यांना कडेचे दिसू नये म्हणून ती बाजू बंद केेलेली असते. यामुळे त्याला समोरचा रस्ता न गोंधळता नीट दिसू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here