पाचल येथे वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
राजापूर : पाचल येथील अर्जुना नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाळूसहीत जप्त करून पाचल मंडल अधिकारी श्री. राईन यांच्या पथकाने कारवाई केली आहे. अर्जुना नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती श्री. राईन यांना मिळाली होती. श्री. राईन व त्यांच्या सहकार्यांनी बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे तुषार कोलते यांचा ट्रॅक्टर वाळूसहीत जप्त केला व पंचनामा करण्यात आला आहे. श्री. राईन यांच्यासोबत पाचल तलाठी पाटील, कोतवाल चिले आदी यावेळी उपस्थित होते.