गावखडीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी : गावखडी येथे तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 8.30 ते शनिवारी सकाळी 6.30 वा. कालावधीत घडली असून पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन कृष्णा शिरवडकर (वय 40, रा. गावखडी, भंडारवाडी) असे तरुणाचे नाव आहे. सचिनने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस हवालदार कुबडे करत आहेत.