अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा रत्नागिरी जिल्हा बँकेतर्फे सत्कार

0
122

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सलग आठव्यांदा ‘दीपस्तंभ’ पुरस्कार प्राप्त झाल्याने संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा जिल्हा बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनमार्फत दिला जाणारा सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता राज्यस्तरीय गटात प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ’ पुरस्कार सलग आठव्यांदा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी या संस्थेला प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाला बँकेचे संचालक मंडळ सदस्य  दिनकर मोहिते, रामचंद्र गराटे, महादेव सप्रे, राजेंद्र सुर्वे,  संजय रेडीज, गजानन पाटील, अमजद बोरकर,  मधुकर टिळेकर,  जितेंद्र साळवी, बँकेचे कार्यकारी संचालक अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here