राजापुरात कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्धार
राजापूर : ‘कातळशिल्प संरक्षण संवर्धन आणि परिसर पर्यटन विकास’ या विषयाच्या अनुषंगाने येथील पंचायत समितीमध्ये नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मयुरी पाटील, कातळशिल्प संशोधक आणि निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, मकरंद केसरकर, सुहास गुर्जर, गटविकास अधिकारी सुहास पंडीत आदी उपस्थित होते.
पुरातन कातळशिल्प महत्वपूर्ण असून त्याद्वारे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. परिसरामध्ये पायाभूत सुविधा उभारण्या संबंधित ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी केले. त्यासाठी लागणारे आवश्यक ते सहकार्य प्रशासकीय स्तरावर देण्याचे आश्वासित केले. पायाभूत सुविधा उभारण्यासह प्रस्ताव सादर करण्यासाठी निसर्गयात्री संस्थेचे आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य घेण्याचे त्यांनी सूचित केल्याचे निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड यांनी माहिती दिली.