अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीपोटी कोकणाला अडीच कोटींची भरपाई

0
31

रत्नागिरी : कोकणातील जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत अतिवष्टीने तीनवेळा पूरस्थिती उद्भवली. कोकणात जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी झाली. या कालावधीत झालेल्या कृषी नुकसानामध्ये कोकणातील सहा हजार शेतकर्‍यांना अडीच कोटींची भरपाई देण्यात येणार आहे. हा निधी भरपाई देण्यासाठी प्राप्‍त झाला असून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अतिवृष्टीच्या काळात भाताबरोबर बागयतीचीही हानी झाली. त्यानुसार  कृषीहानीचा आढावा घेतल्यानंतर कोकणातील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानुसार वाढीव भरपाईची तरतूद करण्यात आली होती. यात जिरायतीसाठी 13 हजार 600, बागयतीसाठी 27 हजार आणि  बहुवार्षिक पिकासाठी 36 हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्याच्या आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे.  मात्र, अन्य विभागाची भरपाई देताना कोकणातील शेतकर्‍यांना डावलल्याची कैफियत शेतकर्‍यांनी मांडली आहे.
 कोकणात  गुंठ्याच्या शेती क्षेेत्रात हेक्टरी प्रमाण अडचणीचा ठरत असल्याने केवळ सहा हजार शेतकर्‍यांनाच ही भरपाईची मात्रा लागू होणार आहे अल्पभूधारक शेतकरी यामध्ये भरपाईच्या कागदाच्या बाहेरच राहिल्याची ओरड आता शेतकर्‍यांतून होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here