पाली खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

0
48

रत्नागिरी : तालुक्यातील पाली-खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश गंगाराम सुवारे (वय 55) हे रानात गवत काढण्यासाठी गेले होते. गवत काढत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला बिबट्याने पाठीमागून अंगावर उडी घेतल्याने सुरेश सुवारे यांना सावध व्हायला वेळ मिळाला नाही. या हल्ल्यात सुरेश सुवारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वन खात्याचे अधिकारी देखील जिल्हा रुग्णालयात पोहोचले असून हल्ल्याचा अहवाल त्यांनी वरिष्ठांना पाठवला असून ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here