कापसाळमध्ये तोतया पोलिसांकडून फसवणूक

0
96

रत्नागिरी : तालुक्यातील कापसाळ गावात मंगळवारी सकाळी गोसावी बावा स्टॉप येथे स्थानिक महिलांना आम्ही पोलिस आहोत, असे भासवून काहींनी अंगावरील दागिने काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर महिलांच्या सतर्कतेने हा अनर्थ टळला. परिसरात ग्रामस्थ असल्याने या तोतया पोलिसांनी तेथून पळ काढला.
तुम्ही अंगावर जास्त दागिने घालू नका, शासनाकडून तसा जीआर काढला आला आहे, अशी बतावणी करून त्यांच्याकडून ते दागिने लंपास करण्याचा इरादा होता. परंतु त्यावेळी तेथे इतर ग्रामस्थ आल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्या तोतया पोलिसांनी तेथून पोबारा केला.
ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन कापसाळ ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास चिपळूण पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here