यंदा लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत 3366 मि.मी.च्या सरासरीने 30286 मि. मी. एकूण पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात झाला आहे. लांजा तालक्यात या वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत लांजा तालुक्यात पावसाने साडेपाच हजारा मि. मी.चा टप्पा ओलांडला आहे. यंदाच्या मोसमात सर्वात कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात नोंदविला आहे. गतवर्षी सप्टेंबर मह्न्यिाच्या पहिल्या पंधरावड्यात जिल्ह्यात पावसाने चार हजार मि.मी.ची सरासरी गाठली होती. या कालावधीत जिल्ह्यात 36 हजार मि.मी.चा टप्पा पार केला होता. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत पाऊस गतवर्षाच्या तुलनेत साडेसहाशे मि.मी.ने पिछाडीवर पडला आहे.