दापोलीत आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या
दापोली : आजारपणाला कंटाळून दापोली शहरातील पोस्टाची गल्ली येथील सागर देसाई (वय 50) याने काल दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सागर श्रीधर देसाई याला दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे सागर देसाई सतत आजारी असायचा. त्याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे अधूनमधून उपचार केले जात असत. आजाराला कंटाळून त्याने 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास घरातील पडवीत साडीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ सचिन देसाई यांनी खबर दिली असून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला हेडकॉन्स्टेबल सुकाळे या करीत आहेत.