
भाट्ये येथे जागतिक नारळ दिन साजरा
रत्नागिरी : दि. 2 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून उत्साहाने प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटये, जि. रत्नागिरी आणि राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रक्षेत्रावर जागतिक नारळ दिन हा कार्यक्रम यशस्वीरित्या झाला. या दिनानिमित्त ‘नारळ आधारित पीक प्रणाली’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. किरण मालशे-कृषिविद्यावेत्ता यांनी केले. प्रथम दीपप्रज्ज्वलन करून नारळ झाडाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर- माजी कुलगुरू, डॉ. बा. सा. को. कृ. वि. दापोली, विशेष अतिथी राजाभाऊ लिमये- माजी उपाध्यक्ष, नारळ विकास बोर्ड, कोची, प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. जे. एल. पाटील, प्रवीण चहाकार, हेमंत गुरसाळे यांनी माहिती दिली. बीडीओ जे. पी. जाधव यांनी प्रगतशील शेतकरी बनण्याचे अवाहन केले.