चिपळूण-मिरजोळी येथे रिक्षा व बस यांच्यात धडक
मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीत कदम सर्व्हीसिंग सेंटर येथे दि.31 रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. रिक्षा व गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस यांच्यात धडक होऊन अपघात झाला.
जखमींना तातडीने नजिकच्या लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याबाबत अधिक तपास व नोंद चिपळूण पोलिसांकडून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरानजिकच्या मिरजोळी येथे रिक्षा व गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस यांच्यात धडक होऊन अपघात झाला. कदम सर्व्हीसिंग सेंटर येथे बुधवारी सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात रिक्षाचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला तर दोन प्रवासी यामध्ये जखमी झाले. तसेच बसच्या दर्शनी काचेचे नुकसान झाले. गणेशभक्तांना घेऊन ही बस सकाळच्या वेळेत मुंबईहून गुहागरकडे जात होती. दरम्यान मिरजोळी ते चिपळूण दरम्यान बस व रिक्षाची धडक झाली.