
चिपळुणात भाजपाकडून गणेशभक्तांसाठी चहा, नास्ता वाटप
चिपळूण : गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांना चिपळुणातील भाजपा कार्यकारिणीकडून दिवसभर चहा, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महामार्गावर या सुविधेचा लाभ चाकरमान्यांकडून घेतला जात आहे. चिपळुणातील भाजपा कार्यकर्त्यांकडून मुंबईतील पदाधिकार्यांच्या सहकार्याने गेले चार दिवस कोकणात उत्सवासाठी येणार्या चाकरमानी प्रवाशांकरिता रात्रंदिवस चहा व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा कार्यरत ठेवण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष आशिष खातू यांच्यासहीत मंदार साठे, परेश चितळे, स्वानंद रानडे, प्रणय वाडकर, प्रभंजन पिंपुटकर, माजी नगरसेवक विजय चितळे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पोलिस प्रशासनाकडून देखील या उपक्रमाला सहकार्य देण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.