कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर 50 हजार जमा होणार

0
142

रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर लाभ योजनेची रक्कम 50 हजार रुपये 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे. त्यासाठी ज्या शेतकर्‍यांचे बँक खाते नाही त्या शेतकर्‍यांनी खाते उघडावे. तसेच आधार प्रमाणीकरण नसलेल्या शेतकर्‍यांनी कर्ज खात्याशी आधारकार्ड लिंक करुन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. योजनेची अंमलबजावणी विहित मुदतीत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे 5 सप्टेंबरपूर्वी आधार प्रमाणीकरण नसलेल्या शेतकर्‍यांच्या नावांच्या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, नागरी सेवा केंद्र, आपले सेवा केंद्रांवर, विविध कार्यकारी संस्था स्तरावर, बँकस्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.पीककर्जाची मुद्दल व व्याजासह पूर्णत: परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना मुद्दल रकमेवर 50 हजारपर्यंतचा प्रोत्साहनपर रक्कम शेतकर्‍यांच्या बचत खात्यावर जमा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here