रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खेडमध्ये राष्ट्रवादीचे रस्त्यावर गाेट्या खेळत अनाेखे आंदोलन
कोकणातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आक्रमक झाले. शनिवारी दि.२७ रोजी भरणेनाका येथील सर्व्हिस रोडवर त्यांनी गोट्या खेळत रस्त्याच्या बाजूला लोळत अनोखे आंदोलन केले.कोकणातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी दि २७ रोजी मुंबई- गोवा महामार्ग परिसरात भरणे येथील सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमधे गोट्या खेळण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धे च्या माध्यमातून रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाला माजी आमदार संजय कदम उपस्थित होते. त्यांनी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात लोळत घोषणाबाजी केली. ‘रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता..’ अशा घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.
www.konkantoday.com