पावस येथे लहान मुलाच्या पायावरून नेली कार

0
128

रत्नागिरी ः अज्ञात कार चालकाने अकरा वर्षाच्या मुलाच्या पायावर कार नेत अपघात केला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना सोमवार 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.45 वा. महाकाली पॅलेस समोरील जयभवानी बेकरीजवळ घडली होती. याबाबत आरती आनंद ठिकरे (वय 39, राहणार पावस धनगरवाडा, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी त्यांचा मुलगा हर्षद ठिकरे (वय 11) हा महाकाली पॅलेससमोरील जयभवानी बेकरीजवळ शाळेत जाण्यासाठी उभा होता. तेव्हा (एमएच-12-जे-1736) कारवरील अज्ञात चालकाने त्याच्या डाव्या पायावरून कार नेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here